व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस’ॲप (Why Waste YEWS)
चांगल्या पर्यावरणासाठी “व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस”(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे
व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस हे जलसंधारणासाठी महाराष्ट्र सरकारचे एक मोहिमेचे ॲप आहे. हे नागरिकांना पाणी वाचवण्यासाठी आणि राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करते.
व्हाय वेस्ट वाइडब्ल्यूएस ॲपविषयी माहिती.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ महाराष्ट्र, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या सहकार्याने वाय वेस्ट वाईडब्ल्यूएस ॲप (यूथ एंगेजमेंट अॅण्ड वॉटर स्टीवर्डशीप) तयार केले आहे
तरुणांसाठी एक व्यासपीठ तयार करुन त्या माध्यामातून त्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा यामागील प्रयत्न आहे.
हे ॲप दैनंदिन पाणी-बचतीची नोंद ठेवण्यासाठी एक साधन असून पाणी गळती दुरुस्त करणे, नळाचा प्रवाह कमी करणे, शॉवर ऐवजी बादलीने पाणी वापरणे, दात घासताना किंवा दाढी करताना पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे, ग्रामीण भागात शोषखड्डे व पाझरखड्डे बनविण्यास प्रवृत्त करणे, अशा छोट्या – छोट्या सवयींसाठी प्रोत्साहित करते.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ७ लाख १० हजार तरुणांना सक्षम करणे, त्यांना साधने पुरवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि एकत्रितपणे पाणी, पर्यावरण आणि शाश्वतता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
आतापर्यंत या तरुणांनी जवळपास दोन लाख नागरिकांना या चळवळीशी जोडून घेतले आहे.
जलसंधारणाची मोठी चळवळ उभारण्याची ही सुरुवात आहे.
महाराष्ट्रातील १ हजार ४०० ग्रीन क्लबमधील ४०हजार युवा स्वयंसेवकांचे जलसंवर्धनसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे
या अभियानांतर्गत राज्यातील १३ निवडक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात (उच्च व तंत्र शिक्षण) शिकत असलेल्या युवक/युवतींची वातावरण, हवामान बदल आणि पाणी बचत याविषयी माहिती वृद्धिंगत करणे, कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणे घेणे, शैक्षणिक संस्थास्तरावर ग्रीन क्लबची स्थापना करणे, पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे, इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत.
महाराष्ट्रातील १३ पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील १९०० महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करणे, तरुणांमध्ये विविध पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणेहे उपक्रम आहेत.
यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन, महा यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन (MYCA) प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन स्वयं-गती अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमासाठी ४८ हजारांहून अधिक नोंदणी झाली असून हवामान बदलाच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी तो खुला आहे. राज्यभरात २३हजार ६७५ जणांनी हवामान बदलाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.